१ ) आपला परिसर कसा बनतो ?
- आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंचा मिळून परिसर बनतो .
२ ) वस्तूंचे गट किती ? व कोणते ?
- वस्तूंचे दोन गट आहेत . सजीव वस्तू व निर्जीव वस्तू
३ ) सजीवांचे गट किती व कोणते ?
- सजीवांचे दोन गट पडतात . प्राणी व वनस्पती
४ ) वनस्पती कोणाच्या आधाराने एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात ?
- वनस्पती मुळाच्या आधाराने एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात .
५ ) पाकळ्या कधी उघडतात ?
- कळीचे फूल होतांना मिटलेल्या पाकळ्या उघडतात.
६ ) परिसराचे घटक कोणते ?
- पाणी व हवा हे परिसराचे घटक आहेत.
७ ) पक्षी घरटी बांधण्यासाठी कशाचा वापर करतात ?
- पक्षी घरटी बांधण्यासाठी कापूस , काड्या , धागे या वस्तूंचा उपयोग करतात .
No comments:
Post a Comment