सुविचार

सुविचार
१) मानवतेची सेवा हीच श्रेष्ठ ईश्वर सेवा होय .
२) निसर्ग हाच मानवाचा गुरू आहे.
३) स्वयं शिस्तीमुळे हमखास यश मिळते.
४) जननी व जन्मभूमी ही स्वर्गा पेक्षाही प्राणप्रिय असते.
५) बुद्धीच्या वाढीबरोबरच अंतःकरणाचाही विकास करा.
६) संकटांना भिऊ नका , संकटांना संधी मानून त्यावर मात करा.
७) चालणाऱ्याचे भाग्यही चालते.
८) इतरांना सुखी करण्याच्या प्रयत्नात सुख तुमच्याकडे आपण होऊन चालत येईल.
९) अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती .
१०) सामर्थ्यवान माणूस काम करत असतो आणि दुबळा माणूस फक्त उपदेश करत राहतो.
११) शिक्षणाचा दर्जा शिक्षक कसे शिकवतात यावर अवलंबून असतो .
१२) श्रमाच्या वेलीलाच यशाची फुले येतात.
१३) स्वातंत्र्याचा इतिहास नेहमीच रक्ताच्या शाईने लिहिला जातो.
१४)शिक्षण शब्दाचा खरा अर्थ म्हणजे बुद्धी, प्रतिभा आणि मानसिक वृत्तीचा खरा विकास होय.
१५) जुना इतिहास घोकण्यापेक्षा ,नवा इतिहास निर्माण करणे गरजेचे आहे .
१६) जगात फक्त ज्ञानाची किंमत होते, अज्ञानाची नाही.
१७) मनाला आनंद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य
१८)  ह्रदयात अपार प्रेम असलं की सर्वत्र मित्र
१९) खोटी टीका करू नका , नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.
२०) वैभव त्यागात असते, संचयात नाही.
२१) मोहाचा पहिला क्षण , ही पापाची पहिली पायरी असते
२२) शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही तो स्वतःहून शिकतो.
२३) काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो
२४)व्यायामामुळे बुद्धी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
२५) आयुष्यातील अडचणी सोडविण्यास समर्थ असते तेच शिक्षण होय.
२६) माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

No comments:

Post a Comment